HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

जय हिंदऐवजी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ घोषणा देणाऱ्यांबद्दल काँग्रेसला सहानुभूती !

नवी दिल्ली | “काँग्रेसला भारताचा तिरंगा जाळणाऱ्या, जय हिंदऐवजी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देणाऱ्यांबद्दल सहानुभूती आहे. म्हणूनच काँग्रेस देशासोबत आहे की देशद्रोह्यांसोबत ?”, असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने मंगळवारी (२ एप्रिल) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. “जर काँग्रेस केंद्रात सत्तेत आले तर देशद्रोहाचे कलम रद्द करू”, असे आश्वासन काँग्रेसच्या या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशमधील आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.

“एकीकडे आम्ही देशद्रोह्यांना कठोर शिक्षा देण्याची भाषा करतो. तर दुसरीकडे काँग्रेस देशद्रोहाचे कलमच रद्द करण्याचे आश्वासन देत आहे. काँग्रेस नक्की कोणासोबत आहे ? देशासोबत कि देशद्रोह्यांसोबत ?”, असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला आहे. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात काँग्रेस जर सत्तेत आली तर भारतीय दंड संहितेतील देशद्रोहाचे कलम (१२४-अ) रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Related posts

राजस्थानच्या उर्वरित मतदारसंघासाठी मतदानाची तारीख जाहीर

News Desk

#LokSabhaElections2019 : आता तुम्हीही शिवसेनेत येऊन युती मजबूत करा !

News Desk

पंतप्रधान मोदींनी नाकारले सार्क संमेलनाचे निमंत्रण

News Desk