HW News Marathi
राजकारण

काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित उद्या शिवसेनेत करणार प्रवेश

नाशिक | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवाीद काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. निर्मला गावित या काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी खासदार माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. काँग्रेसच्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वरच्या आमदार निर्मला गावित गेल्या आठवड्याभरापासून गावित शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यानंतर अखेर गावित मंगळवारी (२० ऑगस्ट) शिवसेनेत प्रवेश करण्याचा मुहूर्त ठरला आहे. गावित मुंबईत मातोश्री येथे त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यापासून गावित शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगल्या होत्या. परंतु बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी निवड झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी गावित यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचे सांगितले होते. मात्र गेल्या आठवड्याभरापासून गावित यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याचप्रमाणे गावित यांनी रविवारी (१८ ऑगस्ट) त्यांच्या निवासस्थानी तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे.

इगतपुरी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने त्याबाबत विचार करुन आमदार गावित जे निर्णय घेतील त्याला पूर्ण सहमती राहील, असे मत कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडले. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पाठोपाठ सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची गावित यांनी भेट घेतल्याने तर्कवितर्क लढविले जात आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागू शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसे यांची नार्को टेस्ट करा | अंजली दमानिया

swarit

भाजप-शिवसेना युती अभेद्य | देवेंद्र फडणवीस

News Desk

भाजपकडून प्रचारासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरेपूर वापर, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी

News Desk