मुंबई | काँग्रेसचे (Congress) महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस संसद भवन ते राष्ट्रपती भवनदरम्यान खासदारांना घेऊन मोर्चाला सुरुवात झाली होती. तेव्हाच दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना ताब्यात घेतले. यावेळी काँग्रेस आंदोलन रोखला आणि आंदोलन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्ये आक्रमक पवित्रा घेतला आहे.
#WATCH | Police detain Congress leader Priyanka Gandhi Vadra from outside AICC HQ in Delhi where she had joined other leaders and workers of the party in the protest against unemployment and inflation.
The party called a nationwide protest today. pic.twitter.com/JTnWrrAT9T
— ANI (@ANI) August 5, 2022
या महागाईविरोधात महाराष्ट्रात देखील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वात मुंबईतील विधिमंडळासमोर आंदोलन करण्यासाठी जात होते. तेव्हाच पोलिसांनी काँग्रेस नेत्यांची धरपकड केली. यात पोलिसांनी नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना अटक केल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसने ट्वीट करतर ही माहिती दिली आहे. या महाराष्ट्र काँग्रेसने ट्वीटमध्ये लिहिले की, “महागाईविरोधात राज्यव्यापी आंदोलन पुकारल्यामुळे कॉंग्रेस नेत्यांना अटक! ED सरकारच्या दबावतंत्रासमोर आम्ही झुकणार नाही, जनतेचे प्रश्न मांडण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही. #महंगाई_पर_हल्ला_बोल”. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अशोक चव्हाण, माजी वर्षा गायकवाड आदी नेत्यांना तब्यात घेतले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.