HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादी, गांधी कुटुंबासोबत राधाकृष्ण विखे-पाटील यांचा समावेश

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्राच्या स्टार प्रचारकांच्या यादीत ४० दिग्गज नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सर चिटीणीस प्रियांका गांधी वाड्रा  यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या भाजपप्रवेशामुळे टीकेचे धनी झालेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे. परंतु प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांना देखील स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. तसेच भारताचा माजी कर्णधार क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन, अभिनेत्री नगमा हे देखील काँग्रेसचे महाराष्ट्रातील स्टार प्रचारक म्हणून काम पाहणार आहेत.

त्याचबरोबर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, मुकूल वासनिक, मिलिंद देवरा, संजय निरुपम, हर्षवर्धन पाटील, कुमार केतकर, शिवराज पाटील यांच्यावर देखील काँग्रेसने स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिली आहे.

 

 

Related posts

लोकसभेच्या जागांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्री-पक्षप्रमुखांची भेट

News Desk

घाम गाळून पिकवलेला कांदा ‘आत्मघातकी’ ठरत आहे !

News Desk

सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत

News Desk