नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केलेल्या ‘चौकीदार चोर है’ या वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाषण करताना बोलण्याच्या ओघात ‘चौकीदार चोर है’ असे शब्द प्रयोग केले होता. परंतु विरोधकांनी ते चुकीच्या अर्थाने घेतले गेले, असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिले आहेत.
Congress President Rahul Gandhi says "he regretted that he gave the statement" (on Rafale verdict), in his reply to the Supreme Court on contempt petition filed by Meenakshi Lekhi https://t.co/Hpjovr3srV
— ANI (@ANI) April 22, 2019
राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ हे वक्तव्य मी राजकीय प्रचाराच्या वेळी बोलणाच्या ओघात केले आहे. परंतु माझ्या राजकीय विरोधकांनी त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढाला आहे. मी हे वक्तव्य जाणून बुजून, हेतुपुर्वक केले असल्याची तक्रार त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. मात्र राहुल गांधी यांनी म्हटले की, तसे काहीही माझ्या मनात नाही’ असे स्पष्टीकरण न्यायालयात दिले आहे.
राफेल विमाने खरेदीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेसोबत संरक्षण मंत्रालयातून फुटलेली गोपनीय कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे फेरविचार याचिका फेटाळण्याची केंद्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून ही कागदपत्रे ग्राह्य धरली आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांनी या प्रकरणी ‘चौकीदार चोर है’, अशी प्रतिक्रिया दिली होती. परंतु, आपल्या निर्णयात ‘चौकीदार चोर है’ असे कुठेही म्हटलेले नसल्याचे नमूद करत न्यायालयाने अवमान याचिकेवर राहुल यांना नोटीस बजावली.
In his reply in Supreme Court, Rahul Gandhi said "my statements were used and misused by the political opponents." and that he "gave the statements in the heat of the political campaigning." https://t.co/99p7e2N2O8
— ANI (@ANI) April 22, 2019
‘चौकीदार चोर है’ या राहुल गांधी याच्या वक्तव्याविरोधात भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. राहुल यांचे वक्तव्य हे जाणून बुजून केले असल्याची लेखी यांनी तक्रारीत म्हणाले आहे. या याचिकेवर सोमवारी (२१ एप्रिल) सुनावणी झाली. चौकीदार चोर है, हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते. मोदी हे चोर आहेत आणि त्यांनी अनिल अंबानी यांना ३० हजार कोटी दिले, अशी टीका राहुल गांधींनी केली होती. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.