HW Marathi
राजकारण

राफेल विमान कराराची कागदपत्रे गहाळ झाली, याचा अर्थ ती खरी होती !

नवी दिल्ली | राफेल लढाऊ विमान कराराची कागदपत्रे गहाळ झाली, तर यांचा अर्थ ती खरी होती, हे कबूल करा, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (७ मार्च) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. ही कागदपत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मंत्रलायतून गहाळ झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात मोदींची चौकशी हावी, अशी मागणी देखील राहुल यांनी केली आहे. राफेल प्रकरणी या पुनर्विचार याचिकेवर बुधवारी (६ मार्च) सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालायत सांगितले आहे. राफेल कराराची कागदपत्रे गहाळ झाल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी आज पत्रकार परिषद करत मोदींवर हल्लाबोल्ल केला आहे.

पीएमओचा हस्तक्षेप होता, असे राफेल कराराच्या फाईलमध्ये नमूद केले होते. जर भाजप दोषी नाही, तर त्यांनी जेपीसीची मागणी का फेटाळली ?, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केली आहे.  जसे देशातील युवांच्या नोकऱ्या गायब झाल्या, आर्थिक विकास अदृश्य झाला आणि आता राफेल कराराची कागदपत्रे देखील गायब झाली असल्याचे सांगत राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडली. ही कागतपत्रे गहाळ कशी झाली यांची चौकशी करण्याची मागणी यावेळी राहुल यांनी केली आहे.

अनिल अंबानींच्या फायद्यासाठी पीएमओचा राफेल करारात समांतर सहभाग झाले होते. राफेल विमान कराराची कागदपत्रे गहाळ झाली असली तरी यांची संपूर्ण चौकशी पत्रकारांनी करावी, यात ज्या व्यक्तीने ३०,००० कोटीचा राफेल घोटाळ्यात सहभागी होता. तिच्यावरअद्याप कोणत्याच प्रकारची चौकशी करण्यात आली नाही.

 

 

Related posts

औसामध्ये युतीच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान मोदी-उद्धव ठाकरे प्रथमच एका मंचावर

News Desk

मोदीजी ही तर जनतेची थट्टा

News Desk

भाजप-सेनेच्या युतीसाठी स्थानिक पातळीवर ताकद लावा, कामाला लागा !

News Desk