HW News Marathi
राजकारण

काँग्रेसने सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांची राष्ट्रीय आघाडी बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा; अबू आजमी

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून जातीयवाद वाढीस लागला आहे. देशाच्या संविधानाला धोका निर्माण झाला आहे. विकास व अच्छे दिन आणण्याच्या आश्‍वासनावर जनतेची फसवणूक करण्यात आली आहे.

भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने देशातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांची राष्ट्रीय आघाडी तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी शीव येथील सोमय्या मैदानावर पक्षातर्फे महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे त्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पक्षाचे प्रवक्ते अब्दुल कादर चौधरी व मेराज सिद्दीकी यावेळी उपस्थित होते.

अखिलेश सिंह यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजवादी पक्ष लोकसभा निवडणूकांचे बिगूल फुंकणार असल्याचे आझमी यांनी स्पष्ट केले. देशात कोणत्याही धर्माच्या सणांना किंवा मिरवणूकांना रस्त्यावर कार्यक्रम करण्यास परवानगी देऊ नये, असे झाल्यास देशातील 60 ते 70 टक्के जातीय विवाद टळतील, असा दावा त्यांनी केला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 2019 च्या लोकसभा निवडणूकांमध्ये भाजप विजयी झाल्यास पुढील काळात देशात लोकशाहीला धोका निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. काळ्या पैशांच्या नावावर केवळ घोषणाबाजी करण्यात आली.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पाकिस्तान कडून होणार्‍या आगळीकीमध्ये भर पडली आहे. पाक विरोध करता करता मोदी सरकारचे पाकिस्तान सोबत आजपर्यंतच्या सर्व सरकारांपेक्षा जास्त चांगले व जवळचे संबंध निर्माण झाल्याची टीका आझमी यांनी केली. लव्ह जिहादच्या नावावर सामान्य नागरिकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम संघ परिवार व भाजप कडून जाणिवपूर्वक होत असल्याचा आरोप त्यांनी केला. लव्ह जिहादचा आरोप करणार्‍यांच्या अनेक नेत्यांच्या मुलींनी मुस्लिम तरूणांसोबत लग्न केले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. विकासाऐवजी देश विनाशाकडे चालल्याचा आरोप त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कसायाच्या दारात उभ्या केलेल्या भाकड, भेदरलेल्या बैलासारखे नेते देश काय सांभाळणार ?

News Desk

तुरुंगातून बाहेर आल्यावर राऊतांनी फडणवीसांच्या वक्तव्याचे केले समर्थन

Aprna

माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे | राम कदम

News Desk