HW News Marathi
राजकारण

काँग्रेसचे पथक दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यावर

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (१० मे) रोजी मुंबईतील टिळक भवन झालेल्या राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, आमदार व वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी समस्यांवर चर्चा करण्यात आली. राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे संकट असून दुष्काळग्रस्तांना वेळेवर व योग्य ती मदत पुरवण्यात भाजप-शिवसेना सरकार अपयशी ठरले आहे. सरकारच्या घोषणा फक्त कागदावरच आहेत. सरकारचे हे अपयश उघडे पाडण्यासाठी व दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे पथक दुष्काळी भागाची पाहणी करत असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन दुष्काळी भागाला तातडीने मदत मिळावी यासाठी सरकारला निर्देश देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांच्या निर्देशानुसार हे दुष्काळी पाहणी दौरे सुरु करण्यात आले आहेत. विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात सोमवारपासून (१३ मे) हे पाहणी दौरे सुरु करण्यात आले आहेत तर मंगळवारपासून (१४ मे) इतर विभागात काँग्रेसचे पथक दौऱ्यावर जात असल्याची माहिती मिळत आहे.

विदर्भ विभागात विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली, मराठवाड्यात बसवराज पाटील व मधुकराव चव्हाण, उत्तर महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात तर पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची दुष्काळग्रस्त समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या दौऱ्यादरम्यान चारा छावण्यांना भेटी देणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीचे झालेले नुकसान तसेच पिण्याच्या पाण्याची स्थिती काय आहे याची माहिती हे पथक घेणार आहे. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अशोक चव्हाण यांना याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साध्वी प्रज्ञा सिंहचे प्रायश्चित, पाळणार २१ तास मौन

News Desk

देशाने ‘नरेंद्र मोदी प्रयोग’ स्वीकारला आहे !

News Desk

उपकार प्राप्त इमारतींना आकारण्यात येणारा वाढीव सेवाशुल्क कर रद्द; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Aprna