HW News Marathi
राजकारण

काँग्रेसच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी घेतले महत्त्वाचे निर्णय

नवी दिल्ली | कमलनाथ यांनी मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होता शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. हा कमलनाथ सरकारचा सर्वात मोठा निर्णय मानला जातो. मध्य प्रदेश पाठोपाठ छत्तीसगढच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अवघ्या काही तासांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफी केले आहे. सत्तेत आल्यास १० दिवसांमध्ये कर्जमाफी देऊ, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये केली.

गेल्या २४ तासांत मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय

मध्य प्रदेश

१) मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ, या निर्णयाचा फायदा ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे.

२) कन्यादान योजनेच्या निधीत भरघोस वाढ, २८ हजाराहून निधी थेट ५१ हजारांवर

३) मध्य प्रदेशामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करणार, नवा उद्योगांमध्ये स्थानिकांना ७० टक्के रोजगार देणे अनिवार्य, अन्यथा अनुदान मिळणार नाही.

छत्तीसगढ

१) १६ लाख ६५ हजार शेतकऱ्यांचे ६१०० कोटी रुपयांचे कर्ज माफ

२) तांदळाला मिळणारा हमीभाव प्रति क्विंटल २५०० रुपयांवर

३) झीरम हल्ल्यातील शहिदांना न्याय मिळवून देण्यासाठी एसआयटीची स्थापना

४) नक्षलविरोधी अभियानाचे विशेष संचालक डी. एम. अवस्थी यांच्यावर असणारी जबाबदारी वाढवली; त्यांना मुकेश गुप्ता यांच्या जागी एसीबी आणि ईओडब्ल्यूची जबाबदारी देण्यात आली.

५) अशोक जुनेजा यांची गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी निवड

६) संजय पिल्लई यांची गुप्तचर विभागाच्या विशेष संचालकपदी नियुक्ती; पिल्लई 1968 च्या बॅचचे अधिकारी

७) झीरम खोऱ्यातील दुर्घटनेवेळी गुप्तचर विभागाचे महानिरीक्षक असलेल्या मुकेश गुप्ता यांची बदली; गुप्ता यांची रायपूरमधील पोलीस मुख्यालयात बदली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य

News Desk

पर्रीकरांचे जळूप्रमाणे खुर्चीला चिकटून राहणे ही कोणती नैतिकता !

News Desk

उदयनराजे भोसले आज ‘खासदारकी’चा देणार राजीनामा

News Desk