HW News Marathi
राजकारण

मराठा आरक्षणाबाबत एकमत, विरोधी पक्ष देखील करणार सहकार्य | मुख्यमंत्री

मुंबई | मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षिय नेत्यांचे एकमत झाले असून विरोधी पक्ष आरक्षणाबाबत सरकारला सहकार्य करणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षिय बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच सरकारने आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे चौकशीनंतर तात्काळ मागे घेण्यासही सहमती दर्शवली आहे.

आंदोलनकर्त्यांवरील सरसकट गुन्हे तात्काळ मागे घ्या, मेघाभरतीबाबत भूमिका स्पष्ट करा, विभागनिहाय जागा, राखीव जागांबाबतचा तपशील २ दिवसांत जाहीर करा, आरक्षणाबाबत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, मराठ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणा-या अधिका-यांवर कारवाई करावी, मागासवर्ग आयोगाचा अहवाल एक महिन्याच्या आत घ्या, त्या आधारे १६ % आरक्षण द्या आणि ते आरक्षण घटनेच्या ९ व्या परिशिष्टात टाकण्यासाठी घटनादुरुस्ती करा म्हणजे ते न्यायालय रद्द करू शकणार नाही, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी बैठकीत विरोधकांनी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कोणत्या आंदोलकांवर होणार कारवाई

मराठा आरक्षणावरुन गेल्या काही दिवसात राज्यात जे आंदोलन सुरु आहे या आंदोलना दरम्यान अनेक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्या आंदोलकांवरील गुन्हे चौकशी करुन त्वरीत मागे घ्यावेत असे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यानी दिले आहेत. परंतु गाड्यांची जाळपोळ, पोलिसांना मारहाण, पोलिसांवर हल्ले ,दगडफेक हिंसाचार केलेल्या आंदोलकांवर होणार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काय म्हणालेत मुख्यमंत्री

  • मेगा भरतीत मराठा बांधवांना न्याय मिळेल.
  • मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानंतर अधिवेशनात घेणार निर्णय.
  • मागासवर्गीय आयोगाला लवकर निर्णय देण्याची केली विनंती.
  • मराठा आरक्षणाबाबत विषेश अधिवेशन होणार.
  • मराठा आरक्षणाबाबत एकमत, विरोधी पक्ष देखील करणार सहकार्य.
  • ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणार.
  • मराठा आंदोलकांवरील गुन्हे चौकशीनंतर मागे घेऊ.
  • आंदोलन करु नका, शांतता राखा.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर आयकर विभाग पंतप्रधान मोदींच्या घरावर छापा टाकणार का ?

News Desk

“खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही”, आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका

Aprna

 शरद पवारांच्या सभेला अखेर परवानगी

swarit