मुंबई | राजकीय वर्तुळात नेहमीच वादाच्या भौव-यात अडकलेल्या आणि चर्चेचा विषय ठरलेल्या कोस्टल रोडचे भूमीपूजन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिका-यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचे पहायला मिळाले.
ठाकरेंनी यावेळी भाजपचे आभार मानले. मुंबईकरांच्या महत्वाच्या विकासकामासाठी आडवे न आल्याबद्दल ठाकरे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे आभार मानले. कोळी बांधवांच्या मनात भीती आहे. त्यांचे काय होईल. काळजी करू नका, कोळी बांधवांच्या कोणत्याही गोष्टीला हात लागणार नसल्याचे आश्वासन देखील यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कोळी बांधवांना दिले. यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते भूमपूजन संपन्न झाले.
मुंबई च्या इतिहासातील सर्वात महत्त्वकांक्षी “नरिमन पॉईंट ते वरळी कोस्टल रोड प्रकल्प” उद्धव साहेबांच्या दूरदृष्टीनेच सत्यात उतरत आहे. #mumbaicoastalroad pic.twitter.com/3Qa4jHqyIG
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) December 16, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.