नवी दिल्ली | भारतानने पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये वायुसेनेने एअर स्ट्राईक केली होती. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले आहेत. भारतीय वायुसनेनेने पाकिस्तानातील बालाकोट येथे केलेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी निशाना साधला
रात ३.३० बजे मच्छर बहुत थे,
तो मैंने HIT मारा।
अब मच्छर कितने मारे, ये गिनने बैठूँ,
या आराम से सो जाऊँ? #GenerallySaying
— General Vijay Kumar Singh (@Gen_VKSingh) March 6, 2019
देशाचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी ट्विट करून म्हटले की, मंगळवारी (२६ फेब्रुवारी) रात्री ३.३० वाजता खूप मच्छर होते, तेव्हा मी ते हिटने मारले. ‘हिट’ मारल्यानंतर किती डास मेले ते मोजत बसू की, आरामात झोपू ?,” असा सवाल करून सिंह यांनी ट्विटरवरून विरोध केला आहे.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हणाले की, “हल्ल्याच्या वेळी ३०० मोबाईल झाडे वापरत होती का ?,” तर केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी “परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी केलेल्या निवेदन हीच सरकारची अधिकृत भूमिका असून तीच मारल्या गेलेल्या अतिरेक्यांची संख्या आहे” असे म्हटले आहे.
Digvijaya Singh: I am not raising questions on the operation, but this the technical age and satellite pictures are possible. Like USA had given solid proof of the Osama operation to the world, we should also do it for our air strike. (2.3.19) pic.twitter.com/p4w4DaRY1g
— ANI (@ANI) March 3, 2019
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेने मंगळवारी (२६ फेब्रुवारी) पाकिस्तानच्या हाद्दीत घुसून दहशतवाद्यांची तळ उद्धवस्त केली. ज्या प्रकारे अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर त्या कारवाईचे सबळ पुरावे संपूर्ण जगापुढे ठेवले होते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या भारतीय वायू दलाने दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत करायला हवे”, असे विधान काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.