HW Marathi
राजकारण

चिक्की पाठोपाठ आता मोबाईल घोटाळा, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप

विशाल पाटील । आपल्या प्रत्येकाच्या जीवनात मोबाईल महत्वाचा आणि अत्यंत जवळाचा घटक झाला आहे. मात्र याच मोबाईलमुळे महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालयात तब्बल ६५ कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना विरोधकांनी लक्ष केले आहे. १०६ कोटींच्या मोबाईल खरेदीत ६५ कोटींचा घोटाळा झाला आहे. १ लाख २० हजार ३३५ मोबाईल खरेदीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. हे सर्व मोबाईल अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार होते. या मोबाईल खरेदीचे काॅन्ट्रॅक्ट सिस्टेक आयटी कंपनीला देण्यात आले.

i7 Panasonic हा फोन या कंपनीकडून ८७७७ रुपयाने खरेदी करण्यात आला आहे. मात्र हा फोन ६००० ते ६४०० रुपयांना विकत मिळतो. हे माॅडेल मार्केटमध्ये चालत नाही. ग्राहकांनी हे फोन नाकारले आहेत. इतकी मोठी आॅर्डर दिल्यानंतर सवलत कशी नाही तसेच हा घोटाळा चिक्की घोटाळ्यासारखाच आहे, असा आरोप विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

तसेच ५ कोटी शेअर कॅलिटल या कंपनीकडे असताना १०६ कोटींची आॅर्डर कशी असाही सवाल त्यांनी केला आहे. आम्ही खुप सारे घोटाळे काढले पण मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली नाही. “तुम खाते रहो मै संभलता हू” असेच मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सांगितलेले दिसत आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे .

Related posts

PM Modi in Shirdi LIVE UPDATES | विविध विकासकामांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ, मोदी शिर्डी दौ-यावर

News Desk

एकनाथ खडसे यांचा भाजपला घरचा आहेर

Gauri Tilekar

वैयक्तीक डेटा चोरीसाठी सरकारने आधार कार्ड केले सक्तीचे

News Desk