HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

माढ्यातील ओपनिंग बॅट्समन आता संघात १२ वा गडी म्हणून खेळत आहे !

मुंबई | भाजप-शिवसेनेच्या युतीचा नारळ आज (२४ मार्च) अखेर कोल्हापुरात फुटला आहे. कोल्हापूरमधील तपोवन मैदानावर भाजप-सेनेची सभा झाली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. “माढ्यातील ओपनिंग बॅट्समनने देखील माघार घेतली असून आता तो संघात १२ वा गडी म्हणून खेळत आहे”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. इतकेच नव्हे तर “आमचे कपडे उतरवणारा अद्याप जन्माला आलेला नाही”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर केली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

 •  माढ्यातून ओपनिंग बॅट्समनने देखील माघार घेतली. आता ते संघात १२ वा गडी म्हणून खेळत आहेत.
 •  तुमच्या १५ वर्षांपेक्षा जास्त काम आम्ही ५ वर्षांमध्ये करून दाखवले आहे.
 •  ५६ पक्षांच्या भरवश्यावर देश चालत नाही
 • देश चालवण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते
 •  वर्षानुवर्षे रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे काम आम्ही केले
 • शेतकरी, सामान्यांच्या पाठीशी आमचे सरकार
 •  आपल्याकडे खूप बोलघेवडे लोक आहेत
 •  हल्ली बारामतीचा पोपट देखील खूप बोलायला लागला आहे
 •  आमचा कपडे उतरवणारा जन्माला आला नाही, फडणवीसांची राज ठाकरेंवर नाव न घेता टीका
 • पश्चिम महाराष्ट्रातील सामना युती १० -० च्या फरकाने जिंकल्याशिवाय राहणार नाही
 • एक विचारधारा सैनिकांसमोर नतमस्तक होते दुसरी विचारधारा सैन्याकडे एअर स्ट्राईकचे पुरावे मागते
 • एअर स्ट्राईकचे पुरावे केवळ दोनच जण मागतात. एक म्हणजे पाकिस्तान आणि दुसरे म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी
 • सूर्याकडे पाहून थुंकले तर थुंकी स्वतःच्याच अंगावर पडते
 • मुख्यमंत्र्यांचे काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान
 • आम्ही इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी असू तर राष्ट्रवादी भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहोत
 • पित्रोडा यांच्या एअर स्ट्राईकवरील वक्तव्यावरून काँग्रेस अध्यक्षांवर सडकून टीका
 •  ये भारत घुसेगा भी, और मारेगा भी
 •  कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच, मुख्यमंत्र्यांची पाकिस्तानवर टीका
 •  मोदींनी सांगितले बदला घ्या, मोदींमध्ये ताकद होती. मोदींनी आदेश दिले आणि सैन्याने कारवाई केली.
 •  आम्ही कदाचित चुकू पण बेईमानी करणार नाही.

Related posts

दुसऱ्या टप्प्यात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी मतदान

News Desk

सध्या अण्णांचे प्राण वाचवा, पुढचे पुढे पाहू !

News Desk

कॉंग्रेसच्या आमदाराचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा

News Desk