May 24, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजप-शिवसेनाचा महामेळावा सुरू, भाषणात सीएसएमटी पूल दुर्घटनेचा उल्लेखही नाही

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती येथे आज (१५ मार्च) भाजप-शिवसेना युतीचा महामेळावा सुरू आहे. युतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा एकाच मंचावर दिसत आहेत. दरम्यान, कालची सीएसएमटी पूल दुर्घटना अगदी ताजी असतानाच सत्ताधारी पक्षाचे नेते मात्र महामेळाव्यांमध्ये दंग आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या भाषणांमध्ये इतक्या मोठ्या दुर्घटनेचा साधा उल्लेखही नसणे हे संतापजनक आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :

  • शिवसेनेने जनतेचे मुद्दे उचलले.
  • सामान्यांना आधार देणारा दुसरा कोणताही पक्ष नाही.
  • युती झाली नसती तर इतरांना त्याचा फायदा झाला असता.
  • शिवसेना-भाजप सामान्यांना तारणारे पक्ष.
  • टीका कोणावर करायची ? कारण ज्यांच्यावर आता टीका करू तेच उद्या शिवसेना-भाजपमध्ये येतील.
  • युतीमधील संघर्षामुळे कधीही विकासात बाधा येऊ दिली नाही.
  • सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवणे हे आपले काम आहे.

Related posts

मोदींना मी झोपू देणार नाही !

News Desk

संजय शिंदे यांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश, माढ्यातून उमेदवारी देखील मिळणार ?

News Desk

महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेची ही घसरण आहे !

News Desk