HW Marathi
राजकारण

मनोज तिवारी लष्करी गणवेशात बाईक रॅलीत सामील, विरोधकांकडून टीका

नवी दिल्ली | पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी हल्ल्यात सीआरपीफचे ४० जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक दहशतवादी तळ उद्धवस्त केली. या घटनेनंतर भारतात देशभक्तीची लाट उसली होती. या घटनेचा फायदा अनेक राजकीय नेत्यांनी घेत असल्याचे चित्र दिसत आहेत. यात दिल्लीतील भाजपचे नेते आणि खासदार मनोज तिवारी यांनी यमुना विहारमध्ये भाजपच्या वतीने रविवारी (३ मार्च) बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

तिवारी यांनी चक्क लष्कराचा गणवेश परिधान करून या रॅलीत सहभागी झाले. लष्करी गणवेशने परिधान केल्याने नवीन वादला तोंड फटले आहे. यापूर्वी कर्नाटकातील भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी कर्नाटकात आता २२ जागा जिंकता येतील असे वादग्रस्त विधान केले होते. लष्कराचा गणवेशाने रॅलीत सहभागी होणे योग्य नसल्याची टीका काँग्रेसकडून केली जात आहे.

“मी बाईक रॅलीत लष्करी गणवेश परिधान केला नसून तो तर टी-शर्ट होता. त्यावेळी हा टी-शर्ट परिधान करण्यास मला अभिमान वाटला. हा एक प्रकरे भारतीय लष्कराला सन्मान देणे साराखाच आहे,” असे स्पष्टीकरण मनोज तिवारी यांनी दिले आहे. यानंतर संपूर्ण प्रकरणावर पडता पडण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे प्रकरण नक्की कोणते वळण घेतली पाहणे ते औयुक्याचे ठरेल.

 

 

Related posts

राष्ट्रवादीचे सरकारविरोधात आज राज्यभर मौनव्रत धारण करत आंदोलन…

News Desk

#LokSabhaElections2019 : चौकीदार हे गरिबांचे नव्हे तर श्रीमंतांचे असतात !

News Desk

‘सन राइज’ करण्याचे वचन दिले होते, ‘सन’ला राइज करण्याचा प्रयत्न सुरू आहे !

News Desk