नवी दिल्ली | दिल्लीच्या फिरोज शाहा कोटला स्टेडियमचे नाव बदलून अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली स्टेडियम करण्याचा निर्णय आज (२७ ऑगस्ट) दिल्ली क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. जेटली हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) उपाध्यक्ष आणि दिल्ली असोसिएशनचे अध्यक्ष होते. येत्या १२ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. जेटली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्टेडियमचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
DDCA President Rajat Sharma to ANI:What can be better to have it named after man who got it rebuilt under his presidentship. It was Arun Jaitley’s support that players like Virat Kohli,Virender Sehwag,Gautam Gambhir,Ashish Nehra, Rishabh Pant & many others could make India proud https://t.co/Bs0GvST4CQ
— ANI (@ANI) August 27, 2019
दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी सांगितले की, ”अरुण जेटली यांच्या पाठिंब्या आणि प्रोत्साहनामुळे विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीरसारखे खेळाडू घडले.” भारताचा माजी सलामीवीर गंभीरने यमूना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे नाव बदलून अरूण जेटली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करावे अशी मागणी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.