नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज (७ फेब्रुवारी) महत्त्वाची बैठक बोलविली आहे. काँग्रेसचे महासचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी बोलविण्यात आले आहे. या बैठकीत पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियांका गांधी यांची उपस्थिती राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते आहे. प्रियांका गांधींची राजकारणात प्रवेश केल्यानंतर अधिकाऱ्यांसोबत पहिल्यांदा बैठकी आहे.
Delhi: Visuals from a meeting of Congress General Secretaries and State in charges at Congress office pic.twitter.com/0M8X9OePvV
— ANI (@ANI) February 7, 2019
काँग्रेसचे दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू इनडोर स्टेडियममध्ये या बैठकीचे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेता मल्लिकार्जुन खडगे आणि गुलाम नवी आजादसह अनेक नेते मंडळी उपस्थित होते. प्रियांका गांधीसह पश्चिम उत्तर प्रदेशचे महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया देखील बैठकीत सहभागी झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी बैठकीद्वारे २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने महासचिवांना त्यांच्या राज्यातील बूथ व्यवस्थापनेद्वारे ग्रास रूट लेवल लक्ष केंद्री करत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.