HW Marathi
राजकारण

देवेंद्र फडणवीस ‘बोगस माणूस’ तर शरद पवार ‘अविश्वासू’ !

कोल्हापूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस ‘बोगस माणूस’, सदाभाऊ खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. ते रविवारी (१० फेब्रुवारी) कोल्हापुरात एका खासगी कार्यक्रमात बोलत होते.

कोल्हापुरात झालेल्या या खासगी कार्यक्रमात घेण्यात आलेल्या “रॅपिड फायर’मध्ये ‘देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि सदाभाऊ खोत यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते ?” असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना “देवेंद्र फडणवीस बोगस माणूस, सदाभाऊ खोत भामटा, तर शरद पवार अविश्वासू” असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

“आम्ही काँग्रेस जायचे की बहुजन विकास आघाडीसोबत जायचे हे अजून ठरविलेले नाही. परंतु, माझी वैचारिक भूमिका अत्यंत ठाम आहे. आम्ही देशाच्या राज्यघटनेला आव्हान देणाऱ्यांसोबत कधीही जाणार नाही”, राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे

Related posts

दिशाहीन काँग्रेससोबत न जाता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार !

News Desk

माझा भीमा-कोरेगाव, एल्गार परिषदेशी काहीही संबंध नव्हता | तेलतुंबडे

News Desk

पंतप्रधान मोदींचा उमेदवारी दाखल, लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन

News Desk