HW News Marathi
राजकारण

काँग्रेस पक्षात माजी सनदी अधिकारी धनंजय धार्मिक यांचा प्रवेश

मुंबई | माजी सनदी अधिकारी व अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय वसंतराव धार्मिक यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. धनंजय धार्मिक मुख्य आयकर आयुक्त म्हणून कार्यरत होते. सेवा निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली ते अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

सनदी सेवेतील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा काँग्रेस पक्षाला फायदा होईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण म्हणाले. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार के. सी. पाडवी, आमदार धनाजी अहिरे, उत्तम खोब्रागडे, माजी खासदार सुरेश टावरे, माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव गेडाम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, रमाकांत म्हात्रे, पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर. सी. घरत, प्रदेश काँग्रेसचे सचिव जिशान अहमद, राजाराम देशमुख उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ.भागवतांनी सर्वांना फसवले | प्रकाश आंबेडकर

News Desk

घाबरु नका मी, काय छोले भटूरे खाणार नाही | मुख्यमंत्री

News Desk

…तर मग फडणवीसांनी शिवसेनेत प्रवेश करावा !

News Desk