HW News Marathi
राजकारण

काँग्रेस नेता ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

नवी दिल्ली | काँग्रेसमध्ये सर्व आलबेल दिसत नाही. काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून मध्य प्रदेशमध्ये चांगलेच राजकारण पेटलेले चित्र दिसत आहे. यात काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या या पदावरून वाद पटेला आहे. ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे. जर ज्योतिरादित्य यांना अध्यक्ष पद मिळाले नाही तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांनी आज (३० ऑगस्ट) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या पदासाठी अनेक नावांवर चर्चा करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर कमलनाथ यांनी पराभवाची जबाबदारी घेत मध्यप्रदेश कॉंग्रेस कमिटीचा राजीनामा दिला होता. यामुळे हे पद अद्याप रिक्त असल्याने मध्य प्रदेशमधील अनेक नेत्यांनी या पदावर दावा केला आहे. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे या पदासाठी योग्य दावेदार असल्याचे मानले जाते. परंतु काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे ज्योतिरादित्य यांना डावल्यास ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मध्य प्रदेशाच्या रजकारणात सुरू आहे.

दरम्यान जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर ज्योतिरादित्य यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. परंतु काँग्रेस सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला होता. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य यांची युवाकांमध्ये प्रसिद्ध असून त्यांच्या प्रवेशाने भाजपचे बळ वाढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका !

News Desk

…अन् विखे-पाटलांनी विचारले कुठले बटण दाबू …?

News Desk

बाळासाहेब ठाकरेंनी देखील राज्यसभेसाठी ऑफर दिली होती | कुमार केतकर

News Desk