HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

शिवसेनेने जैन समाजाचा केलेला अपमान विसरू नका !

मुंबई | “शिवसेनेने काही वर्षांपूर्वी पर्युषण काळात जैन मंदिरासमोर मांसाहार शिजवत जैन धर्माचा अपमान केला होता. ही घटना तुम्ही विसरता कामा नये. आगामी निवडणुकांमध्ये मतदानाच्या माध्यमातून शिवसेनेला धडा शिकवा”, असे आवाहन मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केले आहे. ते मुंबईतील एका अल्पसंख्यांकांच्या कार्यक्रमात बोलत होते. शिवसेना ही अल्पसंख्यांकांच्या विरोधात असल्याची टीका देखील देवरा यांनी यावेळी केली आहे. दक्षिण मुंबईत काँग्रेसचे मिलिंद देवरा आणि शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.

दक्षिण मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या मतांना प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे जैन समाजाला आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरु आहे.  “शिवसेनेला असे वाटते कि, मोदींसाठी सर्व व्यापारी शिवसेनेला मत देतील. शिवसेनेचा हा समज दूर करायला हवा. त्यामुळे, जेव्हा शिवसेनेचे उमेदवार मतं मागायला येतील तेव्हा त्यांच्या कामाबद्दल जाब विचारा. शिवसेनेने काही वर्षांपूर्वी पर्युषण काळात जैन मंदिरासमोर मांसाहार शिजवत जैन धर्माचा अपमान केला होता. हे न विसरता मतपेटीतून शिवसेनेला उत्तर द्या”, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या मतांना प्रचंड महत्त्व आहे.

Related posts

#LokSabhaElections2019 : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, मोदी वाराणसीतून लढणार

News Desk

हा तर भाजपचा पराभव – उद्धव ठाकरे

News Desk

अद्याप शिवसेनेचं तळ्यात-मळ्यात

News Desk