HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

एका पराभवामुळे देश कायमस्वरुपी भाजपकडे सोपविला गेला असे समजू नका ! 

मुंबई । “लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवर दिसणार नाही”, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले असून देशाने केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकारच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. तर निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. नांदेड मतदारसंघातून स्वतः अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण बोलत होते.

“एका पराभवामुळे देश कायमस्वरुपी भाजपकडे सोपविला गेला, असे समजायचे कारण नाही”, असा सूचक इशारा देखील चव्हाण यांनी यावेळी दिला आहे. “आम्हाला आमच्या पराभवाची कारणे शोधून, आत्मपरीक्षण करावे लागेल. राज्यातील उमेदवारनिहाय आकडेवारी समजल्याशिवाय यावर बोलता येणार नाही . मात्र एक गोष्ट खरी की, एका पराभवामुळे देश कायमस्वरुपी भाजपकडे सोपविला गेला, असे समजायची काहीही गरज नाही. काँग्रेस पुन्हा उभारी घेईल”, असा विश्वासही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

“निवडणुकांच्या निकालानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांसह मी देखील निराश झालो. मात्र, राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी या पराभवाची नैतिक जबाबदारी खुल्या मनाने स्वीकारत आहे. यापुढेही पक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे काम करू. पक्षाचे भले लक्षात घेऊन निर्णय घेऊ. या पराभवाने निराश न होता अधिक मेहनत घेऊन पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करू”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

Related posts

मुंबईत शिवसेनेला जोरदार झटका शिवसेनेचे वाघ मनसे मध्ये

News Desk

दक्षित मुंबईतून कोळंबकरांचा युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंना जाहीर पाठिंबा

News Desk

रातोरात महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी भाजपमध्ये विलीन

News Desk