HW News Marathi
राजकारण

गिरीश महाजन यांनी घेतली डॉ. तडवी यांच्या कुटुंबीयांची भेट

मुंबई | आपल्या महिला सहकाऱ्यांकडून जातीयवादावरून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी समाजातील डॉ. पायल तडवी यांनी बुधवारी (२२ मे) आत्महत्या केली होती. या प्रकरणी कारवाईला सुरुवात झाली असली तरीही अद्याप प्रशासनाकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. याविरुद्ध आज (२८ मे) डॉ. तडवी यांच्या कुटुंबियांकडून नायर हॉस्पिटलसमोर जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जात डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

“डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल”, असे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले आहे. “डॉ. तडवी यांच्या कुटुंबीयांच्या मागण्या योग्य आहेत. आरोपी महिलांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मात्र, आरोपी मुली पसार आहेत. कुणालाही माफी नाही. दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल”,असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगभ्रमंती करून हाती काही नाही !

News Desk

काय होतास तू काय झालास तू !, भाजपची बोचरी टीका

News Desk

मोदींनी ‘आयएनएस विराट’प्रकरणी राजीव गांधींवर केलेले आरोप पूर्णपणे खोटे !

News Desk