HW News Marathi
राजकारण

नायर हॉस्पिटलसमोर डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबियांकडून निदर्शने

मुंबई | नायर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या आदिवासी समाजातील डॉक्टर पायल तडवी यांना तेथील महिला डॉक्टर्स जातीयवादातून छळले. या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी कारवाईला सुरुवात झाली असली तरीही अद्याप प्रशासनाकडून मात्र कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. याविरुद्ध आज (२८ मे) डॉ. तडवी यांच्या कुटुंबियांकडून नायर हॉस्पिटलसमोर जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत.

डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबियांसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना हे देखील यावेळी उपस्थित आहेत. राज्यात जातीयवादाचा बळी गेल्याने संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असताना प्रशासन मात्र या प्रकरणी गप्प आहे. इतक्या गंभीर प्रकरणी प्रशासनाने बाळगलेल्या मौनामुळे सर्वत्र अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल तडवी यांनी बुधवारी (२२ मे) आत्महत्या केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन; राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

Aprna

अप्रत्यक्षपणे मोदींच्या हातात काश्मीर

News Desk

भाजपची शिवसेनेला ‘उपसभापती’ ची ऑफर

News Desk