HW News Marathi
राजकारण

राज्यपालांच्या भाषणादरम्यान उत्तर प्रदेश विधानसभेत मोठा गदारोळ

नवी दिल्ली | उत्तर प्रदेश विधानसभेत आज (५ फेब्रुवारी) बजेट अधिवेशनवेळी राज्यपालांचे भाषण सुरु असताना सप आणि बसपच्या आमदारांनी कागदाचे गोळे फेकले. त्याचप्रमाणे या आमदारांनी ‘चले जाव’चे नारे देखील दिले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सप-बसपच्या या वागणुकीचा निषेध केला आहे. यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुधवार (६ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. या गदारोळादरम्यान सपचे आमदार सुभाष पासी बेशुद्ध पडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, “सप आणि बसपच्या आमदारांनी राज्यपालांचा अपमान केला आहे. राज्यपाल राम नाईक भाषण वाचत असताना या आमदारांनी अभद्रतेची सीमा गाठली. अशाप्रकारे अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना वेळ वाया घालवला जातो. सपा आजही दादागिरीतून बाहेर येऊ शकली नाही”, अशी टीका त्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

भाजपचे सर्व प्रयत्न व्यर्थ, आता तरी आत्मचिंतन करा !

News Desk

नवनिर्वाचित मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी घेतली अमित शाह यांची भेट

Chetan Kirdat