HW News Marathi
राजकारण

घाबरु नका मी, काय छोले भटूरे खाणार नाही | मुख्यमंत्री

मुंबई | ‘मला आता नांदेडला जावे लागत आहे. परंतु तुम्ही घाबरु नका मी रस्त्यात इतरांसारखे छोले भटूरे खाणार नाही.’ असा टोला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला. मुंबईतील विलेपार्ले येथे उपोषणासाठी उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित करताना ते बोलत होते. त्याच बरोबर चर्चा न करता विरोधक संसदेत गोंधळ घालतात विरोधकांचे हात अन्यायाने बरबटले आहेत असा आरोप ही यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर केला.

याला निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकदिवसीय उपोषणातून विरोध दर्शविला आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मुंबई अध्यक्ष आषिश शेलार, खासदार पूनम महाजन आणि स्थानिक आमदार पराग अळवणी हे देखील मुंबईच्या विले पार्ले येथे गुरुवारी उपोषणाला बसले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरच्या रणनितीचा वापर करतात !

News Desk

शरद पवारांच्या मते ‘हे’ ३ उमेदवार पंतप्रधान पदासाठी योग्य

News Desk

राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाडमधून लढविणार आगामी लोकसभा निवडणूक

News Desk