HW News Marathi
राजकारण

एकनाथ खडसे यांची नार्को टेस्ट करा | अंजली दमानिया

मुंबई | एकनाथ खडसे यांची नार्को टेस्ट व्हावी आणि समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणात भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक विधान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ खडसे सामाजिक कार्यकत्या कल्पना इनामदार यांच्यावर आरोप केले असून या दोघांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्याकडे केली असल्याचे म्हटले आहे. भोसरी जमीन खरेदी ही माझी पत्नी आणि जावई यांनी ही जमीन खरेदी केल्याचे एकनाथ खडसेंनी वारंवार म्हटले आहे. परंतु, ही जमीन खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आले असा सवाल दमानियांनी यावेळी उपस्थित केला.

रावेर कोर्टातून अटक वॉरंट

रावेर कोर्टाने दिलेल्या तारखेला हजर न राहिल्यामळे अटक वॉरंट काढण्यात आले आहे. मला कोर्टाने १ डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले होते पण माझी तबियत बरी नसल्यामुळे मला कोर्टात हजर राहता आले नाही. मी कोर्टाला मला का हजर राहता आले नाही यांचे कारण सांगितले होते. त्यानंतर ८ जानेवारीला मला पुन्हा एकदा कोर्टाने हजर राहण्यास सांगितले होते. तेव्हा माझ्या मुलीचे लग्न असल्याने मी कोर्टात येऊ शकत नसल्याचे मी कोर्टाला सांगितले असून सुद्धा कोर्टाकडून माझ्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले. कोर्टात उपस्थित न राहण्याचे कारण सांगून सुद्धा कोर्ट अटक वॉरंट कसे काढू शकते, या प्रकरणात कोर्टाची भुमिका स्पष्ट होत नसल्याचे दमानियांनी सांगितले. तसेच एकनाथ खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी मला त्रास देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्यांकडून विविध एकूण २२ ठिकाणी माझ्यावर खोटे केस केल्याचा आरोप अंजली दामानिया यांनी केला आहे.

अण्णांच्या उपोषणात भ्रष्टाचार

अण्णांच्या आंदोलनात कल्पना इनामदार यांनी आर्थिक मदत केल्याचे दामानिया यांनी म्हटले आहे. अण्णांच्या कोअर कमिटिमध्ये भ्रष्टाचारी लोकांचा सहभाग असल्याचा गौप्यस्फोट दमानिया यांनी केला आहे. तसेच हे सर्व मी अण्णांना सांगितल्यानंतर कल्पना इनामदार यांना आंदोलनापासून दूर ठेवू, असे अण्णांनी सांगितल्याचे दमानिया यावेळी म्हणाल्या.

खडसेंचे भोसरी जमीन खरेदी प्रकरण

भोसरीतील जमीन एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर ५२ मधील तीन एकर जागेचा हा वाद आहे. जमीन खडसेंच्या पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. ही जमीन कवडी मोलाच्या भावाने विकत घेण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे !

Gauri Tilekar

विधानभवनावर पोहचण्याआधीच ओला-उबर चालकांना पोलिसांनी रोखले

News Desk

“गद्दार आमदारांनी स्वतःच्या बापाच्या जागी…”, भास्कर जाधवांची शिंदे गटावर टीका

Aprna