HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी घेतली शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची भेट

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंर जुन्या शिवसैनिकांची भेट घेत आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (28 जुलै) शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके (Liladhar Dake) यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. लीलाधर डाके यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली आहे. डाके हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)  यांच्या सुरुवातीच्या कालापासूनच एक कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डाके यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांची सुद्धा भेट घेतली होती. जुन्या नेत्यांना आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुख्यमंत्री त्यांची भेट घेत असल्याचे बोले जात आहे. डाकेंची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री सायंकाळी 5 वाजता माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांची भेट घेणार आहे.

जेष्ठ शिवसेना नेत्यांचा विसर पडला नाही, असा संदेश मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना द्याचा आहे. मुख्यमंत्री डाकेंना भेटीसाठी त्यांच्या निवासस्थान गेले होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर, आमदार संजय शिरसाट आणि माजी आमदार अशोक पाटील हेदेखील सोबत उपस्थित होते.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांचा मनस्ताप अब की बार लांबूनचं नमस्कार……

News Desk

…म्हणून माझी बहिण मला तुरुंगात पाठविण्याच्या प्रयत्नात !

News Desk

शिवसेनेला मोठा धक्का! शिंदे सरकारविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Aprna