HW News Marathi
राजकारण

एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरिटी दिली होती – शरद पवार

“एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी साडेआठवाजता तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी म्हटलं होत.

या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद ( Sharad Pawar )  पवार म्हणाले

“आज सकाळी माजी दिलीप वळसे पाटील सोबत भेट झाली त्यानं मी विचारलं की शिंदे साहेबाना तुम्ही झेड (Z)सिक्युरिटी ( Z Security) दिली होती का ?तर ते हो म्हणाले” .

मी स्वतः माजी गृह मंत्री यांच्याकडून ऐकले होते.म्हणुन या विषयावर अधिक चर्चा करणे मला योग्य वाटत नाही. मला वस्तुस्थिती माहीत नाही पण शासनात अनेक वर्ष काम केल्यानंतर मला एक गोष्टीची माहिती आहे की सुरक्षा कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची याबाबत च जे कोरम आहे, ते कॅबिनेट असत नाही. ही चर्चा कॅबिनेट मध्ये होत नाही.ही चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिव हे गृह सचिव डिजी अश्या सिनियर लोकाची एक कमेटी असते,आणि त्यात पुढे निर्णय आणि शिफारशी केल्या जातात.

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांकडून धोका असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारली असल्याचा गंभीर आरोप सुहास कांदेंनी केला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी गडचिरोलीतील नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. शिंदेंना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला होता, असा दावा आमदार कांदे यांनी केला.

नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपाबद्दल विचारलं असता शरद पवारांनी

“पोराबाळांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देण योग्य नाही”, असं म्हटलं.

काय म्हटलं आहे नितेश राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये?

नारायण राणे (Narayan Rane) यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. नितेश राणेंनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. आता म्याव म्याव संपू द्या, त्यानंतर आम्ही व्याजासकट वस्त्रहरण सुरु करु असा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे. नितेश राणेंच्या या आरोपानंतर खळबळ उडाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरेमध्येच मेट्रो कारशेड करण्याचा भाजप प्रणित राज्य सरकारचा निर्णय मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा! – नाना पटोले

Aprna

१९८४ च्या शीखविरोधी दंगलीविषयी केलेल्या विधानाबाबत पित्रोदा यांनी माफी मागावी !

News Desk

नवनिर्वाचित खासदारांसह उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येत जाणार

News Desk