May 24, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, हिंसाचारमुळे उद्यापासून पश्चिम बंगालमधील प्रचारबंदी

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार कालावधी संपण्यापूर्वीच निवडणू आयोगाने एक दिवसाआधीच आचारसंहिता लागू करण्यात आली. बंगालमध्ये शुक्रवारी (१७ मे) रोजीऐवजी गुरुवारी (१६ मे) रात्री दहानंतर ते लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही पक्षाला प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंगालमध्ये झालेल्या अभूतपूर्व हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये काल (१४ मे) भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान मोठा हिंसाचार झाला. रोड शोदरम्यान अमित शहा उभे असलेल्या ट्रकवर काठ्या फेकण्यात आल्या. तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोंधळानंतर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

 

Related posts

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सोडले मौन

News Desk

काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

News Desk

#LokSabhaElections2019 : पंतप्रधान मोदींनी ट्विट केला निवडणूक प्रचाराचा पहिला व्हिडीओ

News Desk