HW News Marathi
राजकारण

प्रचारसभांचा खर्च सादर करावा, निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस

मुंबई । यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर प्रचारसभा घेत भाजपविरुद्ध जोरदार प्रचार केला. दरम्यान, राज ठाकरे यांना आता त्यांच्या या सर्व प्रचारसभांचा खर्च सादर करावा लागणार असल्याची माहिती निवडणूक आयोग अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने तशी नोटिसच मनसेला पाठविली असल्याचे म्हटले जात असले तरीही मनसेकडून मात्र ही बाब नाकारण्यात आली आहे.

आम्हाला निवडणूक आयोगाकडून अशी कोणतीही नोटीस आली नसल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी अनेक दिवसांपूर्वीच आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याचप्रमाणे आपण राज्यभर भाजपविरुद्ध प्रचार करणार असल्याचे देखील मनसेकडून स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या प्रचारसभा आणि त्याच्या खर्चाबाबत अनेक प्रश्न देखील उपस्थित केले गेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप हा मोदीकेंद्री किंवा शहाकेंद्री पक्ष नाही !

News Desk

अधिकारी माझे ऐकत नाहीत, गिरीश महाजन यांची तक्रार

News Desk

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे निधन

swarit