HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

साध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस

भोपाळ | साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला मुंबई २६/११ हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेले आपले वादग्रस्त वक्तव्य चांगलेच भोवले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने प्रज्ञा सिंह ठाकूरला नोटीस बजावली आहे. भोपाळमधील ज्या कार्यक्रमात साध्वी प्रज्ञाने हे वक्तव्य केले त्या कार्यक्रमाचे आयोजक आणि साध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच निवडणूक आयोगाने पुढच्या २४ तासात याबद्दलचे स्पष्टीकरण देखील मागितले आहे.

साध्वी प्रज्ञाने शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले होते. साध्वी यांच्या या विधानानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. “हेमंत करकरे यांनी मला विनाकारण या प्रकरणात अडकवून ठेवले. मी त्यांना शाप दिला होता कि, तुमचा सर्वनाश होईल. शेवटी ते दहशतवाद्यांकडून मारले गेले. माझे सुतक संपले”, असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञाने केले होते.

आपल्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर साध्वी प्रज्ञाने शुक्रवारी (१९ एप्रिल) रात्री उशिरा आपले विधान मागे घेत माफी मागितली. तर भाजपने मात्र या प्रकरणातून आपले हात वर केले. “साध्वी प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयाक्तिक मत आहे. त्यांच्या या वक्तव्याशी पक्षाचा काहीही संबंध नाही”, असे म्हणत भाजपने एक पत्रक काढून आपली याबाबतची भूमिका स्पष्ट केली.

Related posts

प्रवीण छेडा, डॉ. भारती पवार पुन्हा भाजपमध्ये

News Desk

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

…तर मुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्यावा !

News Desk