HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

आज विधानसभा निवडणुकीची होणार घोषणा, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली | विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोग आज (२१ सप्टेंबर) दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. निवडणूक आयोग यावेळी महाराष्ट्रासह हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. नेमके या निवडणुकीतील मतदान दिवाळीपूर्वी होतील का दिवाळीनंतर होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. “लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानभेचा फॉर्म्युला ठरला असून येत्या दोन दिवसात शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटप जाहीर होईल.”  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (२० सप्टेंबर) पत्रकार परिषदेत याचा खुलासा केला आहे.

तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. आघाडीत प्रत्येकी १२५ जागा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहेत. तर उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी नुकतेच राज्यातील सर्व प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला होता.

Related posts

मोठे कोण ? मुख्यमंत्री की ते चार अधिकारी !

Gauri Tilekar

उदयनराजेंच्या समर्थनार्थ संभाजी भिंडेंची सांगली बंदची हाक!

Arati More

शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीला जामीन, सीबीआयच्या विनंतीनंतर ६ आठवड्यांची स्थगिती

अपर्णा गोतपागर