HW News Marathi
राजकारण

#Election2019 : जाणून घ्या…चंद्रपूर मतदारसंघाबाबत

आगामी लोकसभा निवडणुका आता अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आपला नेता किंवा आपल्या मतदारसंघातून उभा राहिलेला उमेदवार ज्यांना आपण विश्वास ठेऊन मत देतो, निवडून देतो त्यांच्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण वर्धा, नागपूर, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघाबद्दल तेथील उमेदवारांबद्दल जाणून घेतले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या चंद्रपूर मतदारसंघाबाबत, इथल्या उमेदवारांबाबत माहिती करून देणार आहोत. तेव्हा जाणून घ्या… कोण आहे तुमचा नेता ?

चंद्रपूरसाठी उमेदवार कोण ?

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात. ज्यामध्ये चंद्रपूर, वणी,बल्लारपूर, आर्णी, वरोरा आणि राजूरा यांचा समावेश होतो. यापैकी ५ ठिकाणी भाजपची सत्ता आहे. तर वरोरा येथे शिवसेनेची सत्ता आहे. चंद्रपूर मतदारसंघातून यावेळी भाजपकडून केंद्रीय गृहराज्य मंत्री असलेले हंसराज अहीर तर कॉंग्रेसकडून सुरेश धानोरकर लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. याचसोबत बसपचे सुशील वासनिक आणि इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून चंद्रपूरमधून एकूण १३ उमेदवार मैदानात उतरले आहे.

चंद्रपूरमध्ये २०१४ ची स्थिती

२०१४ मध्ये चंद्रपूर मधून भाजपचे हंसराज अहीर, कॉंग्रेसचे संजय देवतळे, आम आदमी पार्टीचे वामनराव चटप उभे होते. त्यावेळी भाजपचे हंसराज अहीर यांचा ५,०८,०४९ मते मिळून विजय झाला होता. तर कॉंग्रेसच्या संजय देवतळे यांना २,७१,७८० मते मिळाली होती. यांच्या मतांचा फरक पाहीला तर 2,36,269 इतक्या मोठ्या फरकानं भाजपचे हंसराज अहीर जिंकूण आले होते. तर आपचे वामनराव चटप यांना २,०४,४१३ इतके मत मिळाली होती. यांच्या मतांची टक्केवारी पाहील्यास भाजपला २८% कॉंग्रेसला १५% आणि आपला केवळ ११% मतं मिळाली होती.

चंद्रपूर मतदारसंघातील मतदारांची संख्या

चंद्रपूर मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या १७,५३,६९० असून या ठिकाणी एकूण महिला मतदार आहे. ८,३२,५९५ तर पुरुष मतदार आहेत ९,२१,०९५ आहेत.

चंद्रपूर या मतदारसंघात एका जातीकडे निर्णायक ठरु शकेल इतकी संख्या नाही. त्यामुळे येथे जातपात यामुद्द्यावर कुठल्याही उमेदवाराला मत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. तर दुसरीकडे २०१४ मध्ये निवडून आल्यानंतर भाजपचे हंसराज अहीर हे केंद्रात मंत्री होउनही त्यांची चंद्रपूरातली कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याचे बोलले जाते. मात्र त्यांचा येथील जनसंपर्क दांडगा असल्याचेही सांगितले जाते. तसेच शिवसेनेचीही भद्रावती आणि वणी येथे चांगली पकड आहे. आता युती झाल्यामुळे त्याचाही फायदा भाजपला होउ शकतो.

कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत

भाजपच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या कॉंग्रेसच्या सुरेश धानोरकर यांनी मागील वर्षी शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना ऐन वेळेवर उमेदवारी देण्यात आली. चंद्रपूरातील इतिहास पहिला तर गेल्या ३ टर्म पासून येथील सत्ता भाजपकडे आहे. तर त्यापूर्वी ही सत्ता अनेक वर्ष कॉंग्रेसकडे होती आता येथून भाजपचे हंसराज अहीर उमेदवार आहे तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे सुरेश धानोरकर उमेदवार आहे. इथे देखील कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत पाहायला मिळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात !

News Desk

प्रसिद्ध गायक दलेर मेहंदींचा भाजपमध्ये प्रवेश, पंजाबमधून निवडणूक लढविण्याची शक्यता

News Desk

कवी छगन भुजबळ,वाचा सविस्तर…

swarit