HW News Marathi
राजकारण

#Elections2019 : जाणून घ्या…मुंबई उत्तर मतदारसंघाबाबत

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत. महाराष्ट्रातील मतदानाचे ३ टप्पे पार पडले आहेत. आता केवळ शेवटचा, चौथा आणि अत्यंत टप्पा शिल्लक राहिला आहे. हा टप्पा येत्या सोमवारी (२९ एप्रिल) पार पडणार आहे.

आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्यातील मुंबई उत्तरलोकसभा मतदार संघाबाबत. मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघांतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात. ज्यामध्ये बोरीवली, दहीसर, मागाठाणे, कांदीवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम या मतदार संघाचा समावेश होतो.

उमेदवार कोण ?

मुंबई उत्तर मतदार संघातून भाजपचे गोपाळ शेट्टी कॉंग्रेसच्या उर्मिला मातोंडकर वंचित बहुजन आघाडीचे सुनील थोरात त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण १८ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहे.

मुंबई उत्तरमध्ये २०१४ ची स्थिती

मुंबई उत्तरमध्ये २०१४ साली भाजपचे गोपाळ शेट्टी यांचा ६,६४,४२२ इतकी मतं मिळून विजय झाला होता. तर कॉंग्रेसच्या संजय निरुपम यांना २,१७,४२२ इतकी मतं मिळाली होती. त्यांच्या मतांचा फरक पाहिल्यास ४,४६,५८२ इतक्या फरकाने भाजपच्या गोपाळ शेट्टी यांचा विजय झाला होता. तर आपच्या सतिश जैन यांना ३२,३६४ इतकी मतं मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी पाहिल्यास भाजपला ३७% टक्के, कॉंग्रेस १२ % तर आपला केवळ १ % मतं मिळाली होती.

मुंबई उत्तर मतदारसंघातील एकूण मतदार संख्या

मुंबई उत्तर मतदारसंघात १७,८३,८७० एकूण मतदार आहेत. या मतदारसंघातील महिला मतदारांची संख्या ८,११,११० इतकी आहे. या मतदारसंघातील पुरुष मतदारांची संख्या ९,७२,७५३ इतकी आहे .

दहिसर, मागाठणे, कांदिवली आणि चारकोप या भागांमध्ये मराठी भाषिकांचे प्रमाण मोठे आहे. येथील विधानसभेची स्थिती पहिली असता येथील बोरीवली, दहिसर, कांदिवली पूर्व और चारकोपमध्ये भाजपची सत्ता आहे. तर मागाठाने येथे शिवसेना आणि मालाड पश्चिम येथे कॉंग्रेसची सत्ता आहे.

मुंबई उत्तर मतदारसंघाचा इतिहास

गेल्या ३० वर्षांत या मतदारसंघात भाजपचाच वरचष्मा राहिला आहे. तर २ वेळा काँग्रेसची सत्ता होती. गोपाळ शेट्टी यांची संसदेत १०० % उपस्थिती राहिली आहे. त्यांनी आपल्या मतदार संघात जवळपास १२ कोटींचा खर्च केल्याचे सांगण्यात येते. यंदा येथून कॉंग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उभ्या आहेत. तर त्यांच्याविरोधात गोपळ शेट्टी उभे ठाकले आहेत. तेव्हा यावेळी येथील मतदार पुन्हा एकदा भाजपच्या बाजूने कौल देतात की चित्र काही वेगळं उमटते हे पाहणं आता महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुसऱ्या टप्प्यात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी मतदान

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Aprna

आम्ही नटरंगसारखे काम कधी केले नाही !

News Desk