HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत. महाराष्ट्रात मतदानाचे २ टप्पे पार पडले आहेत. तर अजून २ टप्पे शिल्लक आहेत. ज्यापैकी तिसरा टप्पा २३ एप्रिल तर चौथा आणि शेवटचा टप्पा २९ एप्रिलला पार पडेल. आज आपण जाणून घेणार आहोत तिसऱ्या टप्यातील जळगाव मतदार संघाबाबत. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात. ज्यामध्ये चोपडा, रावेर, भुसावळ, मलकापूर, मुक्ताईनगर आणि जामनेर या मतदार संघाचा समावेश होतो.

उमेदवार कोण ?

भाजप पक्षाकडून यावेळी रावेर मतदार संघातून रक्षा खडसे, कॉंग्रेस पक्षाकडून डॉ. उल्हास पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून नितीन कांडलेकर लोकसभेच्या मैदानात उतरले आहे. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीकडून डॉ.योगेंद्र कोलते तसेच इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

रावेरमध्ये २०१४ ची स्थिती

रावेरमध्ये २०१४ च्या निवडणुकीत भाजपकडून रक्षा खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनीषदादा जैन तर बहुजन समाज पक्षाकडून दशरथ भांडे हे लोकसभेसाठी उभे होते. त्यापैकी भाजपच्या रक्षा खडसे यांना ६,०५,४५२ इतकी मतं मिळून त्यांचा विजय झाला होता. तर कॉंग्रेसच्या मनीषदादा जैन यांना २,८७,३८४ इतकी मतं मिळाली होती. त्यांच्या मतांचा फरक पहिला तर ३,१८,१०४ इतक्या मतांनी रक्षा खडसे यांचा विजय झाला होता. त्यांच्या मतांची टक्केवारी पाहिली तर भाजपला ३७ %, राष्ट्रवादी काँग्रेसला १८ % तर बसपला केवळ १ % मतं मिळाली होती.

रावेर मतदारसंघातील मतदारांची संख्या

रावेर मतदारसंघात १७,६०,१७५ इतके एकूण मतदार आहेत. तर या मतदारसंघात ८,४२,६६१ इतकी महिला मतदारांची संख्या आहे. तर ९,१७,४८८ इतकी पुरुष मतदारांची संख्या आहे.

रावेर मतदारसंघाचा इतिहास

रावेरचा इतिहास पाहिला तर २०१४ मध्ये येथून भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे येथून जिंकून आल्या होत्या. तर येथील विधानसभेची स्थिती पहिली तर ५ जागांवर भाजपचीच सत्ता आहे. तर चोपडा या एका मतदारसंघात शिवसेनेची सत्ता आहे. म्हणजे रावेरमध्ये पूर्णपणे युती सरकारचीच सत्ता आहे. तसेच रक्षा खडसे यांनी अनेक विकास कामे केल्याचे सांगितले जाते. खडसे यांचा जनसंपजर्कही दांडगा असल्य़ाचे बोलले जाते. तर दुसरीकडे पाणी टंचाई, उपसा सिंचन योजनेचा अभाव, उद्योगाचा रखडलेला विकास या काही प्रमुख समस्या या मतदार संघात आहे. तर रावेर मतदार संघातील काही गावांमधील विकास कामांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

येथील ४ ते ५ गावातील लोकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तसे झाल्यास त्याचा फटका रक्षा खडसे यांना बसण्याची शक्य़ता आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसकडूनही येथे आपला जम बसवण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. आता यावेळी रक्षा खडसे यांच्या विरोधात डॉ. उल्हास पाटील उभे ठाकले आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून नितीन कांडलेकर देखील मैदानात आहे.

Related posts

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या महान संत आहेत !

News Desk

डीजे वादकांना राज ठाकरेंचा पाठिंबा

News Desk

काँगेस-राष्ट्रवादीचे कोणते नेते तुरुंगात जातील, हे कोडे आता मतदारांनी सोडवत बसायचे आहे!

News Desk