HW News Marathi
राजकारण

#Elections2019 : जाणून घ्या…भिवंडी मतदारसंघाबाबत

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील 48 मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत. महाराष्ट्रात मतदानाचे ३ टप्पे पार पडले तर अजून १ टप्पा शिल्लक आहे. ज्यामध्ये उर्वरित मतदारसंघात निवडणुका होणार आहे. येत्या २९ एप्रिला, हा चौथा टप्पा असणार आहे. तर २३ मे ला निकाल जाहीर होतील. आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्यातील भिवंडी मतदारसंघाबाबत. भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये शहापुर,भिवंडीग्रामीण,भिवंडी पश्चिम,भिवंडी पुर्व, कल्याण पश्चिम,आणि मुरबाड या मतदर संघाचा समावेश होतो.

उमेदवार कोण ?

भिवंडी मतदार संघातून यावेळी भाजपचे कपील पाटील कॉंग्रेसचे सुरेश टावरे तर वंचित बहुजन आघाडी कडून अरुण सावंत हे लोकसभेच्या रिंगणात आहे. त्याचबरोबर इतरकाही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण 15 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत.

भिवंडीमधील २०१४ ची स्थिती

२०१४मध्ये भिवंडी मधून भाजपचे कपील पाटील, कॉंग्रेसचे सुरेश टावरे, मनसेचे सुरेश म्हात्रे हे लोकसभेच्या रिंगणात होते. त्यापैकी भाजपच्या कपील पाटील यांचा ४,११,०७० इतक्या मतांनी विजय झाला होता. तर कॉंग्रेसच्या सुरेश टावरे यांना ३,०१,६२० इतकी मतं मिळाली होती. यांच्या मतांचा फरक पाहीला तर १,०९,४५० इतक्या मतांनी भाजपच्या कपील पाटील यांचा विजय झाला होता. यांच्या मतांची टक्केवारी पाहील्यास भाजपला २४ टक्के, कॉंग्रेस ला १७ टक्के, तर मनसे ला ५ टक्के मतं मिळाली होती.

भिवंडीमधील एकूण मतदार संख्या

भिवंडीतील एकुण मतदार आहेत १८,५८,२४७ तर याठीकाणच्या महीला मतदारांची संख्या आहे ८,३७,२१८ तर पुरुष मतदारांची संख्या १०,२०,९१६ इतकी आहे.

भाजपच्या कपील पाटील यांच्यासाठी या आहेत जमेच्या बाजू

विधानसभेची स्थिती पाहील्यास भिवंडी मधील मुरबाड, कल्याण पश्चिम, भिवंडी पश्चिम या तीन मतदारसंघात भाजप, भिवंडी ग्रामीण आणि भिवंडी पूर्वमध्ये शिवसेना,शहापूरमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. येथे कपिल पाटील यांचा कार्यकर्त्यांसोबत दांडगा जनसंपर्क असल्याचेही बोलले जाते. दुसरीकडे भिवंडी शहराची ओळख यंत्रमाग उद्योग नगरीमुळे मँचेस्टर म्हणून केलीजाते. या शहरातील उद्योग वाढीसाठी आणि विकासासाठी केंद्र सरकारने विविध योजना जाहीर केल्या. परंतु प्रत्यक्षात त्याचा फायदा व्यापारी वर्गाला मिळाला नसल्याचेहीसांगितले जाते. मात्र कपिल पाटील यांनी आपली प्रतिष्ठा वापरत राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये मतदारसंघातील विकासकामांसाठी उपलब्ध करून दिले असल्यामुळे त्यांच्य़ासाठी ही जमेची बाजू असल्याच सांगितलं जात आहे.

कॉंग्रेसचे सुरेश टावरे प्रबळ दावेदार

विरोधात उभे असलेले सुरेश टावरे हे सुद्धा प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जातात. यांचा अल्पसंख्याक समाजाबरोबर असलेले संबंध ही त्यांच्यासाठीजमेची बाजू असल्याचं बोललं जातंआहे. तर येथील पाण्याची समस्या, बेरोजगारी अशा अनेक समस्या अजूनही पाहीजे त्या प्रमाणात सुटल्या नसल्याचं सांगितल जात आहे. तेव्हा आता येथुन एकमेकांसमोर उभे ठाकलेले भाजपचे कपील पाटील,कॉंग्रेसचे सुरेश टावरे आणि वंचित बहूजन आघाडीचे अरुण सावंत यांच्यापैकी कुणाच्या हाती सत्ता येते हे पाहणे महत्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेल करारात चाराण्याचा देखील घोटाळा झालेला नाही !

News Desk

“अरे मी बाहेर वॉशरूमला गेलो…”, नाराजीच्या चर्चेवर अजित पवारांचे स्पष्टीकरण

Aprna

EXIT POLL : राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता येणार का ?

News Desk