HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#Elections2019 : जाणून घ्या…बुलढाणा मतदारसंघाबाबत

आगामी लोकसभा निवडणुका आता अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आपला नेता किंवा आपल्या मतदारसंघातून उभा राहिलेला उमेदवार ज्यांना आपण विश्वास ठेऊन मत देतो, निवडून देतो त्यांच्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. देशभरात एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडेल. त्यांपैकी पहिल्या टप्प्यातील ७ लोकसभेच्या जागांसाठीचे मतदान पार पडले आहे. ज्यामध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर, गडचीरोली-चिमुर, भंडारा-गोंदिया, आणि रामटेक या मतदारसंघांचा समावेश होता. येत्या १८ एप्रिलला मतदानाचा दुसरा टप्पा पार पडेल. ज्यात महारष्ट्रातील इतर १० लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. ज्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली,नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या मतदार संघाचा समावेश होतो.

उमेदवार कोण ?

आज आपण पाहणार दुसऱ्या टप्यात येणाऱ्या बुलढाणा मतदारसंघाबाबत जाणून घेणार आहोत. बुलढाणा लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये चिखली, सिंदखेडराजा, बुलढाणा, मेहकर, खामगाव आणि जळगाव जामोद यांचा समावेश होतो. बुलढाणा मतदार संघातून यावेळी शिवसेनेकडून प्रतापराव जाधव तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून डॉ.राजेंद्र शिंगणे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. याच बरोबर बहुजन वंचित आघाडी कडून बळीराम सिरस्कार यांच्यासह इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून बुलढाणा येथून एकूण १२ उमेदवार मैदानात उतरले आहे.

बुलढाणामध्ये २०१४ ची स्थिती

बुलढाणामधून २०१४ साली शिवसेनेचे प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कृष्णराव इंगळे, बसपचे अब्दुल हफीज अब्दुल अजीज, निवडणुकीसाठी उभे होते. त्यावेळी शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांचा ५,०९,१४५ मते मिळून विजय झाला होता. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कृष्णराव इंगळे यांना ३,४९,५६६ मते मिळाली होती. यांच्या मतांचा फरक पहिला तर १,५९,५७९ इतक्या फरकाने शिवसेनेचे प्रतापराव जिंकूण आले होते. तर बसपच्या अब्दुल अजीज यांना ३३,७८३ इतके मत मिळाली होती. यांच्या मतांची टक्केवारी पाहिल्यास शिवसेनेला ३१% राष्ट्रवादी कॉंग्रेसला २१% आणि बसपला केवळ २ % मतं मिळाली होती.

बुलढाणा मतदारसंघातील मतदारांची संख्या

बुलढाणा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १७,५३,६९० असून याठिकाणी एकूण ८,३०,२७५ इतक्या महिला मतदार आहेत. तर ९,१५,५४३ इतके पुरुष मतदार आहेत.

शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात सरळ लढत

गेल्या २ दशकांपासून बुलढाण्याचे सत्ता शिवसेनेकडे आहे. गेल्या ५ वर्षात प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत जवळपास ७२% उपस्थिती दर्शविली आहे. येथील ६ विधानसभेच्या जागांपैकी बुलढाणा आणि चिखली विधानसभा कॉंग्रेसकडे तर सिंदखेड राजा आणि मेहकर येथे शिवसेना तर खामगाव आणि जळगाव जामोद येथे भाजपची सत्ता आहे. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या विशेष समस्या आहे. इतिहास पहिला तर गेली अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता होती. मात्र गेल्या ४ टर्मपासून येथे शिवसेनेची सत्ता आहे. तर काही विधानसभेत कॉंग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे बुलढाणा येथील सरळ लढत शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात होणार असल्याचे दिसून येत आहे.

Related posts

जर पंतप्रधान तुमचा होणार असेल, तर मुख्यमंत्रीपद आम्हाला द्या !

News Desk

शशी थरूर यांचे हे विधान हिंदू धर्माचा जाणूनबुजून केलेला अपमानच !

News Desk

महाआघाडीतील सर्वांनाच पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत !

News Desk