June 26, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#ElectionsResultsWithHW : हा देशाचा अन् लोकशाहीचा विजय !

नवी दिल्ली | देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल आज (२३ मे) आज स्पष्ट झाले आहे. पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊनदेशातील जनतेने मोदी सरकारच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. हा भाजपचा ऐतिहासिक विजय मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जनतेचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अमित शाह तसेच भाजपचे ज्येष्ठ नेत्यांनी राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून देशातील जनतेला संबोधले आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
  • लोकांनी दिलेला जनादेश नव्या भारतासाठी आहे. ज्यांचे कान डोळे बंद आहेत, त्यांना माझे म्हणणे समजून घेणे अवघड होते. पण देशातील जनतेने माझ्या भावनांना समजून घेतल्या आहेत.
  • स्वातंत्र्योत्तर कालखंडात अनेक निवडणुका झाल्या. परंतु, यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान झाले. लोकशाहीच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी घटना आहे.
  • हा विजय देशाचा आहे. हा लोकशाहीचा विजय आहे.
  • मी निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, निवडणूक कोणता पक्ष, उमेदवार किंवा नेता लढत नाही तर देशातील जनता निवडणूक लढते.
  • लोकशाहीसाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबियांसाठी मी संवेदना व्यक्त करत आहे.
  • आम्हाला मिळालेल्या जनादेशाचा आम्ही सन्मान करणार आहोत.
  • धर्मनिरपक्षतेचे चेहरे आता उघडे पडले आहेत. आता धर्मनिरपेक्ष नेत्यांची तोंडं बंद झाली आहेत.
  • देशाला समृद्धीच्या दिशेने न्यायचे आहे. २१ व्या शतकामध्ये देशाला गरिबीतून मुक्त करायचे आहे.
  • जनतेने विश्वासाने आम्हाला मतदान केले आहे. आम्ही जनतेच्या भावना जाणतो. जनतेने दाखवलेल्या विश्वासाने आमची जबाबदारी वाढली आहे.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाचा राजीव कुमार यांना धक्का, हटविली अटकेवरील स्थगिती

News Desk

भाजप नेत्याच्या घरातून १७ देशीबॉम्ब तर ११६ जिवंत काडतुसे जप्त

News Desk

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे गणेश पूजन

News Desk