HW News Marathi
राजकारण

जैश-ए-मोहम्मदचा पुळका कोणाला आहे हे जगाला माहित आहे !

मुंबई । “जैश ए मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मसूद अजहरला सरकारी विमानाने सोडणाऱ्या आणि पठाणकोटमध्ये पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या अधिकाऱ्यांचे पायघड्या घालून स्वागत करणाऱ्या भाजपला, काँग्रेसचा जाहीरनामा पाकिस्तानी आहे असे, म्हणताना लाज कशी वाटत नाही ?”, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

काँग्रेसचा जाहीरनामा आहे की जैश ए मोहम्मदचे घोषणापत्र ?, असा सवाल पुण्याच्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण बोलत होते. “जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतात अनेक हिंसक कारवाया घडवून शेकडो निरपराध लोकांचे बळी घेतले. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करुन ४० जवानांची हत्या केली, त्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरची डिसेंबर १९९९ मध्ये भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारनेच सुटका केली होती. त्याचे फडणवीस यांना सोयीस्कर विस्मरण झाले”, असे टोला चव्हाण यांनी लगावला.

“गेल्या ५ वर्षात काही काम केले नाही. त्यामुळे प्रचारसभेमध्ये सांगण्यासारखे भाजपकडे काहीच नसल्याने पाकिस्तानचा जप करण्यावर आणि धर्माच्या नावावर मते मागण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. विकासाचा फुगा फुटल्यामुळे जनतेच्या दरबारात त्यांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. म्हणूनच कशाचाही संबंध कशाशीही लावण्याचा भाजप नेत्यांचा आटापिटा सुरु आहे. पण जनता सुज्ञ असून भाजपला पराभूत करून त्यांची जागा दाखवून देईल”, असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार यांची भाजप सरकारवर सडकून टीका

Gauri Tilekar

“उबाठा पक्ष प्रमुखांना ‘शकुनी काका’ समजेपर्यंत…”, गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Aprna

हार्दिक पटेलला लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही ?

News Desk