HW News Marathi
राजकारण

EVMHacking : गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची ‘रॉ’कडून चौकशी करा !

मुंबई | भारतात २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम हॅकिंगचा प्रकार घडला होता. या ईव्हीएम हॅकिंगबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना कल्पना होती. म्हणून त्यांची हत्या झाली, असा गौप्यस्फोट एका अमेरिकन सायबर हॅकरकडून करण्यात आला आहे. यानंतर देशातील राजकारणात एकच खळबळ माजली. या संपूर्ण प्रकरणाची ‘रॉ’कडून चौकशी करण्याची मागणी करणारे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मुंडे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘मुंडे साहेब यांचा मृत्यू हा अपघाती नाही, त्यात घातपात असावा अशी शंका साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस होती. त्यामुळे सायबर तज्ञ सय्यद शुजा यांनी लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेत जे गंभीर आणि खळबळजनक दावे केले आहे त्याने या शंकेला पुष्टी मिळाली,’ ते म्हणाले आहे.

लंडनमध्ये सुरू असलेल्या हॅकेथॉनमध्ये सईद सूजा या अमेरिकन सायबर तज्ज्ञाने ईव्हीएम मशीन हॅक केल्या जाऊ शकतात, असा दावा केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत हॅकिंग झाल्याचा आणि त्याची कल्पना असल्यानेच मुंडेंची हत्या करण्यात आल्याचेही सूजा म्हणाला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरातमधील निवडणुकांवेळीही ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा त्याने केला. ग्रॅफाईट आधारित ट्रान्समीटरच्या मदतीने ईव्हीएम उघडता येऊ शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्व क्षेत्रांच्या समृद्धीसाठी विकासाच्या रोडमॅपद्वारे कामे सुरू! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

औरंगाबाद-जालना विधान परिषदेच्या निवडणुकीत अंबादास दानवे विजयी

News Desk

काँग्रेसला मोठा धक्का! राहुल गांधींची खासदारकी रद्द; काय आहे प्रकरण?

Aprna