HW Marathi
राजकारण

राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांबद्दल सेहवागने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आता राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. सेहवागने हरियाणाच्या रोहतक मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याच्या देखील चर्चा सुरु होत्या. मात्र या चर्चांना स्वतः सेहवागनेच पूर्णविराम दिला आहे. “मी राजकारणात येणार या केवळ अफवा आहे”, असे ट्विट करत सेहवागने आपल्याला यात कोणताही रस नसल्याचे म्हटले आहे.

“मी राजकारणात येणार या केवळ अफवा आहेत. २०१४ मध्येही अशा अफवा पसरत होत्या आणि आता २०१९ मध्ये देखील पसरत आहेत. मात्र यात कोणतेही तथ्य नाही. मला तेव्हाही यात काही रस नव्हता आणि आताही नाही”, असे सेहवागने स्पष्ट केले आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांचे वर्चस्व आहे. येथे भाजप सेहवागला तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा रंगली होती.

Related posts

धनगर समाजाला आरक्षण देण्यास हे सरकार कटिबद्ध आहे !

News Desk

आता शाळेत हजेरी लावताना ‘जय हिंद’, ‘जय भारत’ म्हणा

News Desk

आजोबांचा अपमान झाला म्हणून सुजयने पक्ष सोडला !

News Desk