नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिले अर्थसंकल्प आज सादर झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. सीतारामन यांनी अर्थसंकल्पात २० रुपयाचे नाणे येणार असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर सध्या अस्तित्वात असलेली १, २, ५ आणि १० रुपयांची नाणीही नव्या रूपात चलनात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. अंध व्यक्तींनाही सहज ओळखता येतील, अशी खास व्यवस्था या नाण्यांमध्ये केली जाणार आहे.
Finance Minister Nirmala Sitharaman: A new series of coins of Re 1, Rs 2, Rs 5, Rs 10, Rs 20 easily identifiable to the visually impaired were released by the PM on 7th March 2019. These coins will be made available for public use shortly. #Budget2019 pic.twitter.com/XpwPp4ysMh
— ANI (@ANI) July 5, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंदी केली होती. यानंतर सरकारने ५०० रुपयांची नव्या रुपातील नोट आली. तर २०० आणि २००० रुपयांची नवी नोट बाजारात आली. मोदी सरकारने मार्च २० रुपयांचे नाणे चलनात आणण्याची घोषणा केली होती. या नाण्याला १२ कडा असणार आहेत. पूर्वी दोन रुपयांचे नाणे या आकारात होते. तसेच याचा व्यास २७ मिमी आणि वजन ८.५४ ग्रॅम असणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.