HW News Marathi
राजकारण

छिंदम मारहाण प्रकरणी सेनेच्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर | शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमने अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडणुकांवेळी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते. यामुळे शिवसेनानगरसेवकांनी सभागृहातच छिंदमला मारहाण केली होती. सेनेचे नगरसेवक योगिराज गाडे, अमोल उर्फ ज्ञानेश्वर येवले, विजय पठारे, अनिल शिंदे व अन्य चार जणांविरुद्ध शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. या सर्वांच्या विरोधात श्रीपाद छिंदमने तोफखाना पोलीस गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तसेच हा जाणीवपूर्वक मतदान करत असल्याचे शिवसेना नगरसेवकांनी म्हटले होते. परंतु शिवेसनेकडून मला मतदान मागण्यात आल्याची ऑडिओ क्लीप छिंदम याने व्हायरल केली होती. त्यामुळे या प्रकरणातील शिवसेनेचा दुटप्पीपणा सर्वांसोमर उघड केला होता. यानंतर, छिंदमने नगरसेवक योगिराज गाडे, अमोल उर्फ ज्ञानेश्वर येवले, विजय पठारे, अनिल शिंदे व अन्य चार अशा आठ जणांविरुद्ध मारहाण करणे, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे या कलमानुसार फिर्याद दिली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुसरा मोदी तयार होऊ नये म्हणून मी माझे बोट आता कोणाला धरु देत नाही !

News Desk

ममता बॅनर्जींकडून रॉबर्ट वाड्रा यांची पाठराखण

News Desk

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी पुकारला बंद, वाहतूक विस्कळीत

News Desk