HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : १८ मार्चला जाहीर होणार भाजपची पहिली यादी ?

मुंबई | भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी सोमवारी (१८ मार्च) घोषणा करणार असल्याचे सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसेने त्यांच्या लोकसभा उमेदवारांची घोषणा केली आहे. परंतु भाजपने अद्याप त्याच्या उमेदवारांची घोषणा केली नाही. भाजपच्या यादीकडे सर्वांची लक्ष लागले आहे.  युतीमध्ये भाजप २५ जागा लढविणार आहे. भाजपच्या पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, सुभाष भामरे यांच्यासह विद्यमान खासदारांनाही  स्थान दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली आहे.

भाजपमध्ये प्रवेश घेतलेले सुजय विखे- पाटील यांचीही उमेदवारी पहिल्याच यादीत जाहीर होऊ शकते.  गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई) पूनम महाजन (उत्तर मध्य मुंबई), संजय धोत्रे (अकोला), अशोक नेते (गडचिरोली- चिमूर), कपील पाटील (भिवंडी) यांची नावेही भाजपकडून जाहीर होण्याचे संकेत आहेत. ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांच्यावर असलेल्या शिवसेनेच्या नाराजीमुळे गोयल यांचा पर्याय पक्षापुढे असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे.

Related posts

#LokSabhaElections2019 : मुलासाठी संघर्ष उभा राहणे चुकीचे !

News Desk

बोरिवलीत राष्ट्रवादीचा भाजप विरोधात गाजर वाटप करून विरोध

News Desk

महिलांनी एकीचा इतिहास घडवावा, राम कदमांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे कडाडले

News Desk