चेन्नई | ‘महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हे स्वतंत्र भारतातील पहिले दहशतवादी होता,’ असे वादग्रस्त विधान दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्कल निधी मियाम या पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी केले आहे. कमल हासन यांच्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर सर्वस्तरातून तीव्र टीका होऊ लागली आहे.
Kamal Haasan during campaigning in Aravakurichi assembly constituency, Tamil Nadu, yesterday: "I am not saying this because many Muslims are here. I'm saying this in front of Mahatma Gandhi's statue. First terrorist in independent India is a Hindu, his name is Nathuram Godse." pic.twitter.com/LSDaNfOVK0
— ANI (@ANI) May 13, 2019
कमल हसन यांनी चेन्नईतील अरिवाकुरुची विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, नथुराम गोडसे हा महात्मा गांधी यांची हत्या करणारा स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी होता आणि तो हिंदू होता. माझ्यासमोर मुस्लिम असल्याने म्हणत नाही, तर माझ्यासमोर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली उभा असल्याने मी हे बोलत आहे, असे हसन म्हणाले.
गांधीजींची हत्या झाली, त्याचा न्याय मागण्यासाठी मी इथे आलो आहे. मी खरा भारतीय असून देशात शांतता आणि समानता प्रस्थापित व्हावी. हे कोणत्याही भारतीयाला वाटते. माझाही तोच प्रयत्न आहे, असे सांगतानाच तिरंगा ध्वजच भारताचा राष्ट्रीय ध्वज राहिला पाहिजे, असेही हसन प्रचार सभेत म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.