HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘पाच’ महत्त्वाच्या योजना

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज (२ एप्रिल) जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात देशद्रोह आणि पूर्वेकडील राज्यांमधील असलेल्या सशस्त्र बल विशेष अधिकारी कायदा (आफ्सा) कायदा रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. या मुद्द्यावरून नव्या वादाला तोड फुटले आहे.

या जाहीरनाम्या अंतर्गत देशातील २० टक्के गरिबांना किमान उत्पन्न हमी योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार न्याय योजनेतून गरिबांना दर महिन्याला ६ हजार रुपये देण्यात येणार आहे. राहुल यांनी म्हटले की, आमचे निवडणूक चिन्ह हाताला लक्षात घेऊन आम्ही ५ मोठ्या आश्वासनांचा जाहीरनाम्यात समावेश केला आहे.

 

काँग्रेसची पाच मोठी आश्वासने

  •  दरवर्षी देशातील २० टक्के गरीब जनतेच्या खात्यात ७२ हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. ही योजना जाहीर करताना काँग्रेसने ‘गरिबीवर वार, दरवर्षी ७२ हजार’ असा नारा दिला आहे.
  •  काँग्रेसने जाहीरनाम्यात २२ लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. १० लाख लोकांना ग्रामपंचायतींमध्येच नोकरी देणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच नवउद्योजकांना ३ वर्षांपर्यंत कोणतीही परवानगी घेण्याची गरज असणार नाही, असे आश्वासनही जाहीरनाम्यात आहे.
  •  मनरेगात कामाचे दिवस वाढवून १०० वरून १५० करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
  •  शेतकऱ्यांसाठी वेगळ्या अर्थसंकल्पाची घोषणा करण्यात आली असून शेतकरी कर्ज फेडू शकला नाही तर तो गुन्हा ठरणार नाही.
  •  जीडीपीच्या ६ टक्के भाग शिक्षणावर खर्च करण्यात येणार आहे. विद्यापीठ, आयआयटी, आयआयएम सारख्या संस्थांमध्ये गरिबांना शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी प्रयत्न करणार.

Related posts

पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

News Desk

सध्या अण्णांचे प्राण वाचवा, पुढचे पुढे पाहू !

News Desk

सत्ता टिकवण्यासाठी भाजप वाटेल त्या थराला जात आहे !

News Desk