HW News Marathi
राजकारण

पुढच्या ४८ तासांत युतीबाबत निर्णय घ्या अन्यथा… !

मुंबई | “पुढच्या ४८ तासांत युतीबाबत निश्चित करा, अन्यथा आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात करू”, असे अल्टिमेटमच शिवसेनेने भाजपला दिल्याची माहिती मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला असून अद्याप भाजप आणि शिवसेनेत मात्र युतीबाबत संभ्रम कायम आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांमधून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अखेर शिवसेनेने ही भूमिका घेतली आहे.

युतीसाठी शिवसेनेकडून तीन अटी ठेवण्यात आल्या आहेत. पहिली अट पालघरची जागा शिवसेनेला द्यावी तसेच लोकसभेबरोबरच विधानसभेच्या जागांचेही वाटप व्हावे, दुसरी अट शिवसेनेला हवा असलेला एखादा मोठा धोरणात्मक निर्णय सरकारने घ्यावा (उदा. नाणार) आणि तिसरी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापैकी एकाने मातोश्रीवर येऊन शिवसेनेची मनधरणी करावी, या अटींचा समावेश आहे.

“एनडीएने २०१९ मध्ये सत्ता स्थापन केल्यास त्यामध्ये शिवसेना, अकाली दल आणि एनडीएतील मित्रपक्षांची महत्त्वाची भूमिका असेल. एनडीएतील मित्रपक्षांची आपापल्या राज्यातील स्थिती अत्यंत भक्कम आहे. त्यामुळे जर भाजपला केंद्रात त्यांच्या मित्रपक्षांचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी त्या त्या मित्रपक्षांना मंत्रिपद द्यावे”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप २५, तर शिवसेना २३ लढवेल तर विधानसभा निवडणुकीत भाजप १४५, तर शिवसेना १४३ जागा लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु यापूर्वी शिवसेनेकडून आगामी निवडणुकांच्या जागावाटपासाठी १९९५चा फॉर्म्युला वापरण्याची मागणी करण्यात येत होती. शिवसेनेने १९९५ मध्ये विधानसभेच्या १७१ आणि भाजपने ११७ जागा लढवल्या होत्या. त्यावेळी राज्यात १३८ जागा जिंकून युतीचे पहिले सरकार स्थापन झाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेत काही ठिकाणी राष्ट्रवादीने आघाडीविरोधात काम केले !

News Desk

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Aprna

बहुमत चाचणीपूर्वीच ठाकरेंना धक्का! संतोष बांगर शिंदे गटात सामील

Aprna