HW Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या

नवी दिल्ली | देशभरात १७ व्या लोकसभा निवडणुकीचे आज (१० मार्च) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. निवडणुकीची घोषणा होता आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका या लोकसभेसोबत होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक लोकसभेसोबत होणार नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना भाजपने दिलेला पाठिंबा काढल्याने त्यांचे सरकार कोसळले होते. यानंतर राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले आहे. परंतु जम्मू-काश्मीरच्या सीमा रेषेवर तणावाच्या वातावरणामुळे लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घेण्यात येणार नसल्याचे आयोगाने सांगिले आहे. यामुळे सध्या काश्मीरमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

 

 

Related posts

मोदी सरकारच्या इराद्याला कोर्टाच्या निर्णयामुळे चाप | अशोक चव्हाण

News Desk

EVMHacking : मी खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो !

News Desk

मुलायमसिंह यांचे आता वय झाले आहे !

News Desk